गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

व्हॉईस ऑफ मीडिया आणि सामाजिक जबाबदारी

 व्हॉईस ऑफ मीडिया आणि सामाजिक जबाबदारी 



पत्रकार कोण आहे ?

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, तो समाजाचा आवाज बनून काम करतो. समाजातील चांगल्या गोष्टी लोकांसमोर मांडण्याचे काम तो सातत्याने करीत असतो, चांगल्या गोष्टी समाजापुढे मांडल्यामुळे त्याचे अनुकरण करणारा चांगला समाज निर्माण होतो तर समाजातील वाईट गोष्टी, अन्याय, अत्याचार, चोरी, बलात्कार, खून, भ्रष्टाचार, इत्यादि गोष्टीवर लेखणीच्या माद्झ्यामातून अंकुश ठेवण्याचे काम देखील तो करीत असतो. पत्रकाराच्या एका बातमीने लोकांचे आयुष्य घडत असते तर काहीचा खोटा मुखवटा देखील फाडण्याचे काम हाच पत्रकार करीत असतो. अनेक पत्रकार स्वत:च्या जिवाची पर्वा न करता धाडसाने आपले काम करीत असतात, हे करत असताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे याचे अनेक उदाहरणे आपण बघत असतो, अनेकवेळा त्याच्यावरती होणारे भ्याड हल्ले तो सहन करतो परंतु समाजामधून सहानभूती शिवाय त्याला काहीच मिळत नाही. 

पत्रकारांचे जीवन :- 

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पत्रकाराला खूप मान, सन्मान मिळतो, त्याचा खूप वट आहे, पोलिस, राजकारणी देखील पत्रकाराला भीत असतात असे आपण अनेकवेळा ऐकतो, कदाचित यातील बहुतांशी खरे देखील आहे परंतु याच पत्रकारांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये घालण्यासाठी पत्रकाराकडे फी नसते, आजारी पडल्यास किंवा एखादा अपघात झाल्यास उपचारासाठी आर्थिक तरतूद नसते, स्वत:च्या घराचे स्वप्न पाहतच आयुष्यभर भाड्याच्या घरात रहातो, समाजासाठी स्वत:ला वाहून घेतल्यामुळे स्वत:मध्ये नवीन स्किल डेव्हलप करण्यास वेळ नसतो, आयुष्याच्या उत्तरार्धात जगण्यासाठी वणवण फिरण्याशिवाय दूसरा पर्याय नसतो अशी अवस्था समाजामधील अनेक पत्रकारांची आहे. 

पत्रकारांच्या विविध संघटना :- 

पत्रकार लोकांच्या मागण्या लोकशाहीच्या तिन्ही स्थंभापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो परंतु त्याच्या काय मागण्या आहेत, गरजा आहेत ते मात्र हा समाज जाणून बुजून दुर्लक्षित करतो. देशभरामध्ये पत्रकारांसाठी काम करणार्‍या अनेक संघटना उदयास आल्या परंतु त्यातील बहुतांशी संघटना या फक्त पदाधिकार्‍यांना मलिदा मिळावा यासाठीच तयार झालेल्या आहेत. काही संघटना मिळणार्‍या मान-सन्मानावर खुश आहेत तर काही मोठेपणा मिरवण्यासाठी संघटनेचा वापर करीत आहेत. काही संघटना तर फक्त कागदावरच आहेत. काही संघटनेमधील पदाधिकारी, सदस्य यांचा आणि पत्रकारितेचा संबंध देखील नाही. 

व्हॉईस ऑफ मीडियाची पाया भरणी :-

सकाळ माध्यम समुहामध्ये काम करणार्‍या संदीप काळे या संपदाकाने हे सर्व अत्यंत जवळून पहिले होते, अनुभवले होते आणि त्यामुळेच त्यांनी ठरवले की आपण या व्यवसायाचा एक अविभाज्य अंग आहे, हे सर्व पत्रकार माझेच बांधव आहेत, यांना मी उघड्यावर कदापि ठेवणार नाही, असा विचार घेऊन पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी संपादकांना सोबत घेऊन त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया नावाची संघटना स्थापन केली. संघटनेचे काम करीत असताना आपण भरकटूनये म्हणून पंचसुत्री तयार केली व आयुष्यभर याच पंचसूत्रीवर काम करायचे ठरवले. 

व्हॉईस ऑफ मीडियाची पंच सूत्री :-

१) पत्रकारांसाठी घर 

२) पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण 

३) आपघात, भविष्य पुंजी बाबत तरतूद 

४) पत्रकाराने नवे तंत्रज्ञान शिकायचे 

५) सेवा निवृत्ती नंतरच्या आयुष्याचे नियोजन 

आज पर्यंतचे कार्य - सामाजिक जबाबदारी :-

व्हॉईस ऑफ मीडियाने देशभरातील सुमारे अडोतीस हजार पत्रकार या संघटनेमध्ये जोडले आहेत. जगभरातील एकेचाळीस देशांमध्ये आपले काम चालू केले आहे. जगातील शेवटच्या पत्रकारापर्यन्त पोहोचण्याचा मानस आहे. धर्म, जात, पंत, लिंग भेद,इत्यादि पासून विलिप्त राहत सर्व समावेशक संघटना तयार केली आहे. पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यापासून संघटनेचा प्रवास सुरू झाला आहे. आज पर्यन्त संघटनेतील व बाहेरील सुमारे पन्नास हजार पत्रकारांच्या पाल्यांना उत्तम दर्जाचे शिक्षणिक किट पुरविण्यात आले आहे. आणि हा उपक्रम प्रत्येक वर्षी चालू असणार आहे. इयत्ता पहिली पासून ते उच्च शिक्षण घेई पर्यन्त शैक्षणिक कारणासाठी लागणारे साहित्य संघटनेच्या माध्यमातून पुरविले जाते. पत्रकारांचे धावपळीचे जीवन, अवेळी जेवण, चहा, इत्यादीमुळे स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही. म्हणूनच व्हॉईस ऑफ मीडिया प्रत्येक वर्षी पत्रकारांसाठी व त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेते. ज्यामध्ये रक्ताच्या विविध चाचण्या, ब्लड प्रेशर तपासणी, हृदय, यकृत, किडनी, ई .च्या तपासण्या करण्यात येतात व सर्वांना त्यांचा तपासणी रीपोर्ट देण्यात येतो.  

पत्रकारांना तज्ञांमार्फत वेगवेगळ्या विषयावर प्रशिक्षण देण्यात येते. बारामती येथे महाराष्ट्रातील पत्रकारांचे भव्य असे अधिवेशन घेण्यात आले होते. तसेच राज्याच्या विविध भगत देखील मोठ्या स्वरुपात अधिवेशने घेण्यात आली. जळगाव येथे संघटनेच्या मुख्य पदाधिकारींसाठी केडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांवर होणार्‍या हल्याचा विरोध म्हणून राज्यभर निषेध नोंदवून, शासकीय अधिकार्‍यांना त्वरित कार्यवाही करावी म्हणून निवेदन देण्यात येते व त्याचा पाठपुरावा करण्यात येतो. पत्रकारांना निवृत्ती नंतर मिळणारे तुटपुंजे मानधनात वाढ व्हावी म्हणून उपोषण, निवेदन, मंत्र्यांच्या व संबंधित अधिकार्‍यांच्या गाठी-भेटी घेण्यात आल्या, पाठपुरावा करून शासनाने चौदा हजार रुपयाचे मानधन वीस हजार रुपये केले. पत्रकारांच्या घरासाठी शासन स्तरावर जागा उपलब्ध व्हावी म्हणून मागणी पत्र देण्यात आले. सहा जानेवारी रोजी असणार्‍या बाळशास्त्री जांभेकऱ यांचा जन्म दिन म्हणजेच दर्पण दिन ज्येष्ठ पत्रकारांचा सपत्नीक सत्कार, रक्तदान, करियर मार्गदर्शन, रुग्णांना फळे वाटप, प्रबोधनात्मक व्याख्यान, इत्यादि उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. संघटनेतील पत्रकाराचे आकस्मिक निधन झाल्यास त्यांच्या परिवाराला फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत देण्यात येते. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना एखादी शस्त्रक्रिया किवा महागडा उपचार करावा लागत असल्यास तो मोफत व्हावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. संघटनेतील पत्रकारांना दहा लाखाचा अपघात विमा वितरित करण्यात आलेला आहे. सकारात्मक पत्रकारिता रुजविण्यासाठी प्रत्येक वर्षी सकारात्मक बातम्या लिहिणार्‍या पत्रकारांना पुरस्कृत करण्यात येते ज्यामध्ये प्रथम बक्षीस हे एक लाख रुपयांचे असते. 

अशा प्रकारे व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांचा आधार बनण्याचे काम करत आहे. आपण ही देशातील सर्वात मोठ्या संघटनेमध्ये आजच सामील व्हा असे आवाहन करतो.

धन्यवाद.

– गणेश शिंदे, राज्य महासचिव, व्हॉईस ऑफ मीडिया 

मो. 9921077388, 

ई-मेल आय.डी. ganesh 224610@gmail.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा