दोन वर्षापूर्वी माझे मित्र जपानच्या दौर्यावर गेले होते तेंव्हा त्यांनी सांगितलेला अनुभव असा आहे की, जपान या देशमध्ये फिरल्यानंतर कळतेकी देशभक्ती कशाला म्हणतात, कारण तेथे घाण व कचरा तेथील नागरिक स्वत: करत नाहीत व इतरांना करूही देत नाहीत. जपानमधील शाळेचा पहिला तास हा स्वच्छतेचा असतो, विद्यार्थी व शिक्षक पहिला तास वर्गाची व परीसराची स्वच्छता करण्यात घालवतात. कचरा डस्टबीन मध्येच टाकला जातो मग तो घरी असो किंवा बाहेर, आपण मात्र डस्टबीन नाही हे कारण पुढे करतो परंतु आपण एखादा रिकामा बॉक्स जर कचरा गोळा करण्यास शाळा, कॉलेज, मंदीर, किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी ठेवला तर त्याचा उत्तम डस्टबीन म्हणुन वापर होऊ शकतो.
जपानमधील सर्व सरासरी आयुष्यमान हे जगातील इतर लोकांच्या आयुष्यमानापेक्षा ५ ते १० वर्षानी जास्त आहे. स्वच्छतेचा परिणाम शारीरीक, मानसीक व बौध्दिकतेवर होतो असे तर विज्ञानसुध्दा सांगते कारण स्वच्छता असेल तर शरीर सुदृढ राहील, शरीर सुदृढ असेल तर मन व बुध्दि सुदृढ राहू शकते. स्वच्छता ही जबरदस्तीने न करता ती स्वेच्छेने प्रत्येकाने ठेवली पाहिजे. साधे एखादे चॉकलेट किंवा बडिशोप पुडी जरी खाल्ली तरी त्याचे रॅपर लगेच डस्टबीन मध्ये टाकले पाहिजे, जर डस्टबीन उपलब्थ नसेल तर ते रॅपर खिशात ठेवून जेंव्हा डस्टबीन मिळेल तेव्हा त्यात टाकले पाहीजे. अशा प्रकारे आपण वागलो तरच आपला परिसर, गाव व देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.
आज गांधी जयंती निमित्त आपण संकल्प करूया की, स्वच्छता ही आपल्या पासून सुरू करू.
स्वच्छ भारत...सुंदर भारत..खूप छान लेख आहे सर...👍👌
उत्तर द्याहटवा