गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

व्हॉईस ऑफ मीडिया आणि सामाजिक जबाबदारी

 व्हॉईस ऑफ मीडिया आणि सामाजिक जबाबदारी 



पत्रकार कोण आहे ?

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, तो समाजाचा आवाज बनून काम करतो. समाजातील चांगल्या गोष्टी लोकांसमोर मांडण्याचे काम तो सातत्याने करीत असतो, चांगल्या गोष्टी समाजापुढे मांडल्यामुळे त्याचे अनुकरण करणारा चांगला समाज निर्माण होतो तर समाजातील वाईट गोष्टी, अन्याय, अत्याचार, चोरी, बलात्कार, खून, भ्रष्टाचार, इत्यादि गोष्टीवर लेखणीच्या माद्झ्यामातून अंकुश ठेवण्याचे काम देखील तो करीत असतो. पत्रकाराच्या एका बातमीने लोकांचे आयुष्य घडत असते तर काहीचा खोटा मुखवटा देखील फाडण्याचे काम हाच पत्रकार करीत असतो. अनेक पत्रकार स्वत:च्या जिवाची पर्वा न करता धाडसाने आपले काम करीत असतात, हे करत असताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे याचे अनेक उदाहरणे आपण बघत असतो, अनेकवेळा त्याच्यावरती होणारे भ्याड हल्ले तो सहन करतो परंतु समाजामधून सहानभूती शिवाय त्याला काहीच मिळत नाही. 

पत्रकारांचे जीवन :- 

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पत्रकाराला खूप मान, सन्मान मिळतो, त्याचा खूप वट आहे, पोलिस, राजकारणी देखील पत्रकाराला भीत असतात असे आपण अनेकवेळा ऐकतो, कदाचित यातील बहुतांशी खरे देखील आहे परंतु याच पत्रकारांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये घालण्यासाठी पत्रकाराकडे फी नसते, आजारी पडल्यास किंवा एखादा अपघात झाल्यास उपचारासाठी आर्थिक तरतूद नसते, स्वत:च्या घराचे स्वप्न पाहतच आयुष्यभर भाड्याच्या घरात रहातो, समाजासाठी स्वत:ला वाहून घेतल्यामुळे स्वत:मध्ये नवीन स्किल डेव्हलप करण्यास वेळ नसतो, आयुष्याच्या उत्तरार्धात जगण्यासाठी वणवण फिरण्याशिवाय दूसरा पर्याय नसतो अशी अवस्था समाजामधील अनेक पत्रकारांची आहे. 

पत्रकारांच्या विविध संघटना :- 

पत्रकार लोकांच्या मागण्या लोकशाहीच्या तिन्ही स्थंभापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो परंतु त्याच्या काय मागण्या आहेत, गरजा आहेत ते मात्र हा समाज जाणून बुजून दुर्लक्षित करतो. देशभरामध्ये पत्रकारांसाठी काम करणार्‍या अनेक संघटना उदयास आल्या परंतु त्यातील बहुतांशी संघटना या फक्त पदाधिकार्‍यांना मलिदा मिळावा यासाठीच तयार झालेल्या आहेत. काही संघटना मिळणार्‍या मान-सन्मानावर खुश आहेत तर काही मोठेपणा मिरवण्यासाठी संघटनेचा वापर करीत आहेत. काही संघटना तर फक्त कागदावरच आहेत. काही संघटनेमधील पदाधिकारी, सदस्य यांचा आणि पत्रकारितेचा संबंध देखील नाही. 

व्हॉईस ऑफ मीडियाची पाया भरणी :-

सकाळ माध्यम समुहामध्ये काम करणार्‍या संदीप काळे या संपदाकाने हे सर्व अत्यंत जवळून पहिले होते, अनुभवले होते आणि त्यामुळेच त्यांनी ठरवले की आपण या व्यवसायाचा एक अविभाज्य अंग आहे, हे सर्व पत्रकार माझेच बांधव आहेत, यांना मी उघड्यावर कदापि ठेवणार नाही, असा विचार घेऊन पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी संपादकांना सोबत घेऊन त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया नावाची संघटना स्थापन केली. संघटनेचे काम करीत असताना आपण भरकटूनये म्हणून पंचसुत्री तयार केली व आयुष्यभर याच पंचसूत्रीवर काम करायचे ठरवले. 

व्हॉईस ऑफ मीडियाची पंच सूत्री :-

१) पत्रकारांसाठी घर 

२) पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण 

३) आपघात, भविष्य पुंजी बाबत तरतूद 

४) पत्रकाराने नवे तंत्रज्ञान शिकायचे 

५) सेवा निवृत्ती नंतरच्या आयुष्याचे नियोजन 

आज पर्यंतचे कार्य - सामाजिक जबाबदारी :-

व्हॉईस ऑफ मीडियाने देशभरातील सुमारे अडोतीस हजार पत्रकार या संघटनेमध्ये जोडले आहेत. जगभरातील एकेचाळीस देशांमध्ये आपले काम चालू केले आहे. जगातील शेवटच्या पत्रकारापर्यन्त पोहोचण्याचा मानस आहे. धर्म, जात, पंत, लिंग भेद,इत्यादि पासून विलिप्त राहत सर्व समावेशक संघटना तयार केली आहे. पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यापासून संघटनेचा प्रवास सुरू झाला आहे. आज पर्यन्त संघटनेतील व बाहेरील सुमारे पन्नास हजार पत्रकारांच्या पाल्यांना उत्तम दर्जाचे शिक्षणिक किट पुरविण्यात आले आहे. आणि हा उपक्रम प्रत्येक वर्षी चालू असणार आहे. इयत्ता पहिली पासून ते उच्च शिक्षण घेई पर्यन्त शैक्षणिक कारणासाठी लागणारे साहित्य संघटनेच्या माध्यमातून पुरविले जाते. पत्रकारांचे धावपळीचे जीवन, अवेळी जेवण, चहा, इत्यादीमुळे स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही. म्हणूनच व्हॉईस ऑफ मीडिया प्रत्येक वर्षी पत्रकारांसाठी व त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेते. ज्यामध्ये रक्ताच्या विविध चाचण्या, ब्लड प्रेशर तपासणी, हृदय, यकृत, किडनी, ई .च्या तपासण्या करण्यात येतात व सर्वांना त्यांचा तपासणी रीपोर्ट देण्यात येतो.  

पत्रकारांना तज्ञांमार्फत वेगवेगळ्या विषयावर प्रशिक्षण देण्यात येते. बारामती येथे महाराष्ट्रातील पत्रकारांचे भव्य असे अधिवेशन घेण्यात आले होते. तसेच राज्याच्या विविध भगत देखील मोठ्या स्वरुपात अधिवेशने घेण्यात आली. जळगाव येथे संघटनेच्या मुख्य पदाधिकारींसाठी केडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांवर होणार्‍या हल्याचा विरोध म्हणून राज्यभर निषेध नोंदवून, शासकीय अधिकार्‍यांना त्वरित कार्यवाही करावी म्हणून निवेदन देण्यात येते व त्याचा पाठपुरावा करण्यात येतो. पत्रकारांना निवृत्ती नंतर मिळणारे तुटपुंजे मानधनात वाढ व्हावी म्हणून उपोषण, निवेदन, मंत्र्यांच्या व संबंधित अधिकार्‍यांच्या गाठी-भेटी घेण्यात आल्या, पाठपुरावा करून शासनाने चौदा हजार रुपयाचे मानधन वीस हजार रुपये केले. पत्रकारांच्या घरासाठी शासन स्तरावर जागा उपलब्ध व्हावी म्हणून मागणी पत्र देण्यात आले. सहा जानेवारी रोजी असणार्‍या बाळशास्त्री जांभेकऱ यांचा जन्म दिन म्हणजेच दर्पण दिन ज्येष्ठ पत्रकारांचा सपत्नीक सत्कार, रक्तदान, करियर मार्गदर्शन, रुग्णांना फळे वाटप, प्रबोधनात्मक व्याख्यान, इत्यादि उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. संघटनेतील पत्रकाराचे आकस्मिक निधन झाल्यास त्यांच्या परिवाराला फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत देण्यात येते. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना एखादी शस्त्रक्रिया किवा महागडा उपचार करावा लागत असल्यास तो मोफत व्हावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. संघटनेतील पत्रकारांना दहा लाखाचा अपघात विमा वितरित करण्यात आलेला आहे. सकारात्मक पत्रकारिता रुजविण्यासाठी प्रत्येक वर्षी सकारात्मक बातम्या लिहिणार्‍या पत्रकारांना पुरस्कृत करण्यात येते ज्यामध्ये प्रथम बक्षीस हे एक लाख रुपयांचे असते. 

अशा प्रकारे व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांचा आधार बनण्याचे काम करत आहे. आपण ही देशातील सर्वात मोठ्या संघटनेमध्ये आजच सामील व्हा असे आवाहन करतो.

धन्यवाद.

– गणेश शिंदे, राज्य महासचिव, व्हॉईस ऑफ मीडिया 

मो. 9921077388, 

ई-मेल आय.डी. ganesh 224610@gmail.com 

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

लाखों तुफानो से संभलकर, हमने आपने घर बचाये है

 दुनिया मजेसे चलती थी, मौज, मस्ती करती थी,

आपने ही खयालोमे, उसि तरह गुम रहती थी.

 

World






ना जाने कहासे , काले बादल छाये ,

सोचा नही था जो कभी ,आज वो सच हो जाये.

 

कोरोना नाम के छोटेसे, छोटे इस विषाणू ने,

दुनिया को जब रोका, दरवाजे पर ही उसने हमको टोका.

 

Corona Virus






एक से दो हुए, दो के हो गये हजार,

पुरी दुनिया संक्रमित हुई, हुवा बडा बुरा हाल.

 

ऐसा पहली बार हुवा था, आदमी-आदमीसे डरा था,

अस्पतालोंमे ढेर लाशोंके, जलाने के लिए घरवाले थे.

 

डॉक्टर, नर्सेसने जान की बाजी लगाई, खुद को मौत को सौंप कर,

दुसरो की जान बचाई, खतरों से लढकर भी जीत उन्होने पाई.

 

doctors






देश के वैज्ञानीयोने, अपना हुनर दिखाया,

दिन-रात एक करके, वॅक्सीन को खोज निकाला.

 

Corona Vaccine







पहले किसी ने डरा दिया, झुटे शब्दोंके जालोसे,

जब सच्चाई सामने आई, बडा सुकून मिला सच्चाई से,

 

लंबी लंबी कतारे लगी, वॅक्सीन लेने अस्पतालोंमे,

क्या बडे, क्या युवा, मुस्कूराने लगे गालों में.

 

एक सौ करोड सुरक्षित लोगोने, दुनिया को चौंकाया है,

एक-एक करते करते, इस मुकाम तक आज पहुचे है.

 

India






न रुके थे कभी, न ही रुक पाएंगे,

चलते चलते मंजिल को एक न एक दिन हम पाएंगे.

 

ये कोरोंना क्या चीज है, इस भारत भूमी के सामने,

लाखों तुफानो से संभलकर, हमने आपने घर बचाये है.

Home


बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

पावसा परत आता तु बरसशील का ?

आकाशाकडे नजरा आता,
भुईवर एकही थेंब नाही,
करपुन गेल रानं माझं,
हिरवळीची आस मेली.
पावसा परत आता तु बरसशील का?
कोरड्या पडलेल्या माझ्या मनाला,
पालवी फुटवुन जाशील का?
कर रं किरपा ह्या बळी राजा ,
हिरावुन नेलास घास का?
पदरी घाल झालेल्या चुका, 
बरसुन बरसुन तोड बांध ,
माझ्या आसुसलेल्या आसवाचा.
                     -गणेश शिंदे, बाशीॅ.

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

वही काफी है मेरे लिए

आप मुझे अच्छा समझो या बुरा,
उससे मुझे कुछ फरक नही पडता,
आप मुझे पहचान ते हो, वही काफी है, मेरे लिए.

मै पैदल चलू या किसी महंगी कार में,
उससे मुझे कुछ फरक नही पडता,
आप के दिल पर दस्तक दे पाता हूॅ, वही काफी है,मेरे लिए.

हमे देख कर आपके चेहरे पर मुस्कराहट आऐ न आए,
उससे मुझे कुछ फरक नही पडता,
आपको देखकर हमारी खुशी का ठिकाणा नही रहता, वही काफी है, मेरे लिए.

माना कि आप बात, करते कम, सुनते जादा है,
उससे मुझे कुछ फरक नही पडता,
लेकिन तेरे धडकन की आवाजोंसे सब समज जाते है, वही काफी है, मेरे लिए. 

हो कोरोनाची गरज होती - कविता

हो कोरोनाची गरज होती
Corona Virus coronavirus covid-19












निरभ्र आकाश होण्यासाठी,
निर्मळ नदी वाहण्यासाठी,
दुषित हवा घालवण्यासाठी,
हो कोरोनाची गरज होती.
Corona Virus coronavirus covid-19





पैशाचा मजा उतरवण्यासाठी,
गरिबीची लाज घालण्यासाठी,
माणूस म्हणून जगण्यासाठी,
हो कोरोनाची गरज होती.

निसर्गापेक्षा स्वतःला सर्व श्रेष्ठ समजणार्यांसाठी,
देवाला हि हिन समजणार्यांसाठी,
या दोघांच्या शक्तीचा अंदाज येण्यासाठी,
हो कोरोनाची गरज होती.

परंतू,
जेंव्हा कोरोनामुळे जवळचे माणूस सोडून जाते,
उपचारासाठी पैश्यांची तारांबळ उडते,
हताशा व निराशा शिवाय काहीच लागत नाही हाती,
तेंव्हा असे वाटते,
कोरोनाची गरजच नव्हती.


आई-बाप नावाच्या विद्यापीठामध्ये

माझा जन्म झाला,
माझ्या आई-बाप नावाच्या विद्यापीठात,
मी वाढलो, शिकलो, जगलो,
माझ्या आई-बाप नावाच्या विद्यापीठामध्ये.
Mummy_Pappa







सत्कार्य कसे करावे, 
सत्य आणि खरे बोलावे,
नाती कशी टिकवावी,
पाप-पुण्य काय आहे,
हे मी शिकलो,
माझ्या आई नावाच्या विद्यापीठामध्ये.

निस्वार्थ प्रेम कसं करावं,
आपली आसवे लपवून,
स्वतःचं मन मारून,
दुसर्याला आनंद कस द्यावा,
हे मी शिकलो,
माझ्या आई नावाच्या विद्यापीठामध्ये.

बाप झाल्यावर आपल्या मुलांची स्वप्ने,
हेच आपले लक्ष्य,
किती हि त्रास झाला तरी ,
चेहर्यावर एक छटा हि न दाखवणे,
लोण्यासारख्या मनावर दगडाची चादर टाकणे,
हे मी शिकलो,
माझ्या बाप नावाच्या विद्यापीठामध्ये.

हार कधी मानायची नाही, प्रयत्न कधी सोडायचे नाहीत,
प्रचंड पैसा कमवायचा पण त्यात तळतळाट कोणाचा घ्यायचा नाही,
कर्म हाच धर्म आणि कर्म हीच पुजा, माणून काम करत रहायचे,
कोणत्याही कामाला लागायचे नाही,
हे मी शिकलो,
माझ्या बाप नावाच्या विद्यापीठामध्ये.

पप्पा-मम्मी










आई-बाप माझे गुरू, कुलगुरू आहेत,
आई-बाप माझे आदर्श,
आई-बाप माझा देव आहेत,
आई-बापाचे माझ्यावरील प्रेम हेच माझे सुवर्णपदक आहे.






गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

शरद पवार नाव माझं...

आले किती, गेले किती,
येतील किती, जातील किती,
आलेत्यांची होईल चांदी, गेलेल्यांची झाली माती,
शरद पवार नाव माझं, गाव बारामती.

मला संपविण्याचा कट, त्या नियतीनेही रचला,
महाभयंकर कर्करोग मुखामध्ये पेरला,
रडलो नीही, पडलो नाही, हार तर मुळीच मानली नाही,
महाभयंकर कर्करोगावर करतोय मी मात,
शरद पवार नाव माझं, मराठी माझी जात.

अपेक्षांचे अोझे घेऊन, दिवस रात्र फिरतो,
पूराने भरलेल्या आसवांना, पुसत मी निघतो,
थांबा नाही, विश्रांती नाही, नाही घेत उसंती,
शरद पवार नाव माझं, लोक माझे सांगाती.

बार्शीच्या भगवंताला, एकच माझे मागणे,
पुर्ण होऊ दे, महाराष्ट्रातील जनतेची सर्व स्वप्ने,
काट्या कुट्यांच्या वाटेवरती, फुलं मी पेरतो,
शरद पवार नाव माझं, जनतेसाठी जगतो.

बा पांडुरंगा तुझ्या चरणी, साकडे मी घालेल,
पंतप्रधानाचे स्वप्न माझे, नाही पुरवले तरी चालेल,
कोणाच्या ही डोळ्यांमध्ये, आश्रु आता नको आहेत,
दैन्य, दु:ख दूर करण्यास , तुझे हात हवे आहेत.

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

नव युगातील नवरात्रीची नव रूपे

हिंदू धर्मामध्ये सणावारांचे अनन्य महत्व आहे.हे सणवार नसते तर मनुष्य जन्माला आला काय आणी गेला काय, काहीच अर्थ राहिला नसता. सण म्हणजे उत्सव असतो. प्रफुल्लीत मन, आनंदी चेहरा, निर्मळ भावना यांचा सुरेल संगम असतो. प्रत्येक सणावारा मागे काही तरी कथा, शास्त्र, विज्ञान, ईतिहास नक्कीच आहे. कारण हिंदूलोक अविचाराने काहीही करत नाहीत. प्रत्येक सण वेगळा, त्या प्रत्येक सणाची मजा वेगळी, देवी-देवते सोबतच निसर्ग, पशु-पक्षांची पुजा ही करतो.
प्रत्येक सण आप-आपल्या एेपती प्रमाणे साजरा करण्याची मुभा. दिवाळीला श्रीमंत व्यक्ती पन्नास हजाराचे कपडे घेऊ शकतो तर, गरीब पाचशेचे घेऊन त्याच एेटीत मिरवतो. श्रीमंत सगळ्या घरावर रोशनाई करतो तर गरीब पाच पणत्या लावून आपली झोपडी प्रकाशाने भरतो. एकमेकांना भरभराटी,चांगले आरोग्य, संपन्नतेच्या शुभेच्छा देतो.वेगवेगळी पक्वान्नं देत, घेत खातो. देशाच्या आर्थिक विकासाला अशाच प्रकारे चालना देतो. कारण जगातील अनेक जाती,धर्माचे लोक जिवंत आहेत हिंदू धर्मियांच्या सणांमुळे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या वस्तुंची खरेदी- विक्री होते व मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.
आज विजया दशमी दसरा. याची सुरूवात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून होते. मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, सार्वजनिक उत्सवातही, हे सारे सोपस्कार केले जातात. घरोघरीही घटस्थापना होते. प्रत्येक घराची पद्धत निराळी. कुणाकडे उठता-बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण, सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. तर कुणी धान्यफराळ करतात. एकुणात नऊ दिवस धावपळीचेच असतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो. त्यासाठी गोंधळी बोलावले जातात. अर्थात यावत तेलम् त्यावत् आख्यायनम् हे आलेच.
देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते.
स्त्री शक्तीचा सन्मान करणारा हा सण.
आई, आजी, मावशी व आत्या, बहिण , पत्नी, भाची व पुतणी, मुलगी, सून व परस्त्री ही नवरात्रीची नऊ रूपे आहेत. प्रेम, समर्पण व सहनशिलतेचा त्रिवेणी संगम म्हणजे स्त्री.
आजच्या दिवशी माझ्यी जीवनात असलेल्या सर्व स्त्रीयांना सलाम व खुप खुप प्रेम.

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

कोरोना काळामध्ये मातृभूमी प्रतिष्ठान मदतीला

Annapurna Yojna

कोरोना काळामध्ये मातृभूमी प्रतिष्ठानने वाटले एक लाख जेवणाचे डबे
दिनांक 23 मार्च, 2020 पासून समग्र भारतामध्ये लॉक डाऊन घोषित झाला , आणि गरीब, बेघर, कामगार लोकांचे अतोनात हाल सुरू झाले , अनेक जण बाहेरगावी अडकले अशा परिस्थितीमध्ये मातृभूमी प्रतिष्ठानने जेवणाचे डबे पोच करण्याचं काम सुरू केलं. दररोज तब्बल दोन हजार डबे वितरित करण्यात येत होते. प्रतिष्ठान मार्फत मास्क व सैनी टायझर देखील वाटण्यात आले. सलग चाळीस दिवस मातृभूमी प्रतिष्ठानचे संचालक मंडळ, सभासद या सर्वांनी अत्यंत मेहनतीने हे काम पूर्ण केले . बार्शी शहरांमध्ये एकही व्यक्ती उपाशी झोपू नये याची आम्ही संपूर्णपणे काळजी घेतली. सदर कालावधीमध्ये बार्शी शहरातील अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट व त्यांचे नातेवाईक अडकलेले होते त्या सर्वांना देखील मोफत डबे वितरीत करण्यात आले. दिनांक 17 जुलै,2020 पासून परत एकदा बार्शी शहरांमध्ये दहा दिवसांचा लॉक डाऊन सुरू झाला व आम्ही परत सर्व गरजूंना घरपोच डबा देण्याचे काम अविरतपणे करत आहोत.
तसेच बार्शी नगर परिषदेच्या सहकार्याने बार्शी शहरातील काही वॉर्डांमध्ये ट्रॅक्टरद्वारे सॅनिटायझर फवारणी केली.
यापुढेही केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने मातृभूमी प्रतिष्ठानला एखादा सामाजिक उपक्रम राबविण्यास सांगितल्यास आम्ही तो आनंदाने राबउ.
Annapurna Yojna, Matrubhoomi Pratishthan

दिनांक 15 जून 2014 रोजी बार्शी शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्तम यश मिळविलेल्या व ज्या समाजातून आपण आलोय त्या समाजाप्रति आपलं काहीतरी देणं आहे या भावनेतून वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्था संघटनांचे अध्यक्ष एकत्र आले व त्या सर्वांनी बार्शी शहर व तालुक्यामध्ये वंचित असणाऱ्या लोकांसाठी व्यापक स्वरूपात कार्य करण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानची स्थापना केली.
ग्रामीण भागामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट बसविण्यात आले , महिलांसाठी निवारा शेड उभी करण्यात आली , जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांसाठी चार प्रकारची खेळणी बसविण्यात आली बालवाडीतील मुलांना आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले केशर आंब्याची रोपे दिली गेली , ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबीर, जलसंधारण अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यात आली . त्यानंतर खामगाव सुर्डी व श्रीपत पिंपरी येथे वृद्ध विकलांग निराधार व्यक्तींना रोज दोन वेळेस पुरेल एवढा डबा देण्याचा उपक्रम अन्नपूर्णा योजना या नावाने चालू करण्यात आला . तसाच उपक्रम बार्शी शहरांमध्येही चालू करण्यात आला व बार्शी शहरांमध्ये 164 लाभार्थी नियमित याचा लाभ घेत आहेत .
ग्रामीण भागातून बार्शी शहरांमध्ये वैद्यकीय सेवा घेण्याकरिता मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात . काही कारणास्तव त्यांची जेवणाची सोय होत नाही ही बाब लक्षात घेऊन प्रतिष्ठानने अवघ्या दहा रुपयात दोन चपाती व भाजी किंवा वरण भात हॉस्पिटलमध्ये देण्याचे चालू केले . पेशंटच्या नातेवाईकांना मोफत वापरासाठी चादर सतरंजी उपलब्ध करून देण्यात आली .
एमपीएससी यूपीएससी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ मार्गदर्शन द्वारे स्पर्धा परीक्षेविषयी माहिती देण्यात येते , त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येते . तसेच विविध शासकीय योजनांची माहिती अनेकांना नसते त्या सर्व योजना समजावून सांगणे त्याचे मोफत फॉर्म भरून देणे व त्याचा फॉलॉवर घेणे इत्यादी कामेही प्रतिष्ठान मार्फत केली जातात .
मातृभूमी प्रतिष्ठान हे 12 A, 80G व FCRA नोंदणीकृत आहे .
प्रतिष्ठानला आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा समाज कल्याण विभागाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

Annapurna Yojna

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

विटे समोरील पांडूरंग

जगातील एकमेव प्रेमळ संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय.
जीवन जगत असताना आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेणारा संप्रदाय.
समोरचा आपल्या पुढे झुकला तर आपणही त्याच्यापुढे झुकणे म्हणजे वारकरी संप्रदाय.
कर्म हाच धर्म, आणी धर्म म्हणजेच विठ्ठल असे माननारा.
घरी अठरा विश्व दारिद्र्य असले तरी मनाने मात्र कुबेराचा धनी.
पंढरपूर हाच स्वर्ग आणी चंद्रभागा म्हणजे अमृताने दुथडी वाहणारी नदी.
पांडुरंगावरती निस्सीम श्रध्दा परंतु अंधश्रध्देला कुठेही थारा नाही.
आपल्याकडे असणार्या समुद्रातून ओंजळ भरून देणारे तर अनेक असतात परंतु आपल्या फाटक्या झोळीत मुठभर असतानाही आपले सर्वस्व अर्पण करणे म्हणजे वारकरी.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काळीज, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर जीवण जगणारा वारकरी.
पसायदानामध्ये सर्व विश्वाचे कल्याण होवो अशी इच्छा व्यक्त करणारे संत ज्ञानेश्वर,
प्रपंच करत असतानाही भगवद भक्ती करणे म्हणजेच जगदगुरु संत तुकाराम महाराज.
संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा आमचा महाराष्ट्र.
कपाळी टिळा, गळ्यात माळा, दिनांचा कैवारी विठू सावळा.
"यावत चंद्र दिवाकरो" असणारा संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय.

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

"प्रेमास्ते" कविता


माझ्या समोर ती आहे
तीझ्या समोर मी आहे
मी तीला, ती त्याला पाहत आहे.


मी प्रेमात आहे,
ती प्रेमात आहे,
माझे तीच्यावर, तीचे त्याच्यावर प्रेम आहे.


मला लग्न करायचे आहे
तीला लग्न करायचे आहे
मला तिच्याशी, तीला त्याच्याशी लग्न करायचे आहे.


माझा संसार सुखाचा आहे
तीझा संसार सुखाचा आहे
माझा माझ्या बायको सोबत, तीचा तिच्या नवर्यासोबत आहे.


मला तिची आठवण येत नाही
तिला माझी आठवण येते आहे
मी काही करणार नाही, तिला काही करू देणार नाही.

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

🧹 स्वच्छता ठेवूया गांधीखातर 🧹

Narendra modi, mahatma gandhi, peace, cleanliness, india
     ज्या भारताला हजारो  वर्षांचा वारसा आहे, ज्या भारताने एकेकाळी सर्व जगाला तंत्रज्ञान, आध्यात्म व जीवन जगायला शिकविले त्या भारतामधील लोकांनाच स्वच्छतेविषयी प्रेरीत करावे लागतेय हे आपले दुर्दैव आहे. अजुनही आपल्याला कचरा रस्त्यावर टाकु नका, शौचालयाच वापर करा, इतरत्र थुंकू नका म्हणून समजवावे लागतय.

     दोन वर्षापूर्वी  माझे मित्र जपानच्या दौर्‍यावर गेले होते तेंव्हा त्यांनी सांगितलेला अनुभव असा आहे की,  जपान या देशमध्ये फिरल्यानंतर कळतेकी देशभक्ती कशाला म्हणतात, कारण तेथे घाण  व कचरा तेथील नागरिक स्वत: करत नाहीत व इतरांना करूही देत नाहीत. जपानमधील शाळेचा पहिला तास हा स्वच्छतेचा असतो, विद्यार्थी व शिक्षक पहिला तास वर्गाची व परीसराची स्वच्छता करण्यात घालवतात. कचरा डस्टबीन मध्येच टाकला जातो मग तो घरी असो किंवा बाहेर, आपण मात्र डस्टबीन नाही हे कारण पुढे करतो परंतु आपण एखादा रिकामा बॉक्स जर कचरा गोळा करण्यास शाळा, कॉलेज, मंदीर, किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी ठेवला तर त्याचा उत्तम डस्टबीन म्हणुन वापर होऊ शकतो.

clean india, swach bharat, tajmahal, lal killa
    जपानमध्ये एके  दिवशी सकाळी एक  स्त्री तिच्या कुत्र्याला फिरायला घेउुन निघाली. रस्त्याच्याकडेला त्याकुत्र्याने घाण केली, त्या स्त्रीने आपल्या पर्समधून एक कॅरीबॅग काढली व ती घाण त्या पिशवीत भरली, ती पिशवी लगेश शेजारच्या कचरा कुंडीत टाकली. सॅनिटायझरने हात स्वच्छ केले व पर्समधून एक स्प्रे काढला व या ठिकाणी कुत्र्याने घाण केली होती त्याच्यावर स्प्रे केला. तिने ती जागा निर्जंतुक केली. आपल्या देशातील परिस्थिति अत्यंत विरोधी आहे. आपण घरातील कचरा रस्त्यावर टाकतो व आपल्याच देशाला नावे ठेवतो.

   जपानमधील सर्व सरासरी आयुष्यमान हे  जगातील इतर लोकांच्या आयुष्यमानापेक्षा ५ ते १० वर्षानी जास्त आहे. स्वच्छतेचा परिणाम शारीरीक, मानसीक व बौध्दिकतेवर होतो असे तर विज्ञानसुध्दा सांगते कारण स्वच्छता असेल तर शरीर सुदृढ राहील, शरीर सुदृढ असेल तर मन व बुध्दि सुदृढ राहू शकते. स्वच्छता ही जबरदस्तीने न करता ती स्वेच्छेने प्रत्येकाने ठेवली पाहिजे. साधे एखादे चॉकलेट किंवा बडिशोप पुडी जरी खाल्ली तरी त्याचे रॅपर लगेच डस्टबीन मध्ये टाकले पाहिजे, जर डस्टबीन उपलब्थ नसेल तर ते रॅपर खिशात ठेवून जेंव्हा डस्टबीन मिळेल तेव्हा त्यात टाकले पाहीजे. अशा प्रकारे आपण वागलो तरच आपला परिसर, गाव व देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.

     आज गांधी जयंती निमित्त आपण संकल्प करूया की, स्वच्छता ही आपल्या पासून सुरू करू.

gandhi jayanti, 2nd october, cleanliness